आनंदाची बातमी…. हावडा-नांदेड एक्सप्रेसचा वणीला मिळाला स्टॉप

जाणून घ्या कधीपासून मिळणार वणीला स्टॉप

0

वणी: अखेर वणी आणि परिसरातील नागरिकांची हावडा एक्सप्रेसच्या वणी स्टॉपची मागणी मान्य करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्टपासून हावडा नांदेड एक्सप्रेस ही वणीत थांबणार आहे. लांब पल्याच्या गाड्यांना वणीत स्टॉप द्यावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. सोबतच चैन्नई जोधपूर या एक्सप्रेसला चंद्रपूर हा स्टॉप देण्यात आला आहे.

या संबंधी रेल्वे प्रशासनानं गुरुवारी एक अधिसूचना जारी केली आहे. ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी या ट्रेनसंबंधीची आणि स्टॉप संबंधीची सर्व माहिती डेटा सिस्टिमवर अपडेट केली जाणार आहे.

(हे पण वाचा: पोळ्याच्या दिवशी विद्यार्थी सुट्टीपासून वंचित)

हावडा गाडीचा वणीला स्टॉप मिळाल्यानं आता लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी तसंच नांदेडला जाण्यासाठी आणखी एका गाडीचा पर्याय वणीकरांना उपलब्ध होणार आहे. सध्या नंदिग्राम एक्सप्रेस आणि ताडोबा एक्सप्रेस या दोन गाड्यांचा वणीला स्टॉप आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.