मारेगाव शहर झाले हागणदरी मुक्त ?

नगरपंचायतचा दावा, कार्यालयावर लावले बॅनर

0

मारेगाव: मारेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा नगरपंचायतीनं केला आहे. 11 ऑगस्टला झालेल्या स्वच्छता समितीच्या आढावा बैठकीत असा दावा करण्यात आला आहे. शहरातील शौचालायाचं बांधकाम परिक्षण तसंच शहराबाहेरील गोदरी पाहणी करण्यात आली. याचा लेखाजोखा जिल्हा प्रशासकीय अधिकारी शशीमोहन नंदा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचवण्यात आला आहे.

शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक घरी शौचालय असणं गरजेचं आहे. शिवाय ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करणं गरजेचं आहे. गाव आणि शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी शर्यत लागली असून, शासनाची शाबासकी मिळविण्यासाठी आणि शहर निर्मळ बनवण्यासाठी प्रत्येक गाव आणि शहर प्रयत्नशील आहेत. हागणदारीमुक्त होण्यासाठी मारेगाव नगरपंचायतनं टोकाचे प्रयत्न केले असून त्यात ते यशस्वी झाले असल्याचं नगरपंचायत प्रशासनाचं म्हणणं आहे.

(विद्यार्थ्यांनी टाकला चक्क शाळेवर बहिष्कार)

शहर हागणदारीमुक्त झालं असल्याचा दावा जरी नगरपंचायत करीत असलं, तरी काही शौचालय लाभार्थ्यांना अजूनपर्यंत बांधकामाचे धनादेश मिळायचे बाकी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहर हागणदारी मुक्त कसं झालं असा प्रश्न काही लोक उपस्थित करीत आहे. या स्वच्छता आढावा बैठकीला मारेगावचे तहसिलदार विजय साळवे, पोलीस निरीक्षक अमोल माळवे, नगराध्यक्षा इंदिरा किन्हेकार, मुख्याधिकारी संदीप बोरकर, इंजिनियर ढेपले आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.