Yearly Archives

2019

कॅन्सर हा बरा होणारा रोग: डॉ. बोमनवार

निकेश जिलठे, वणी: कॅन्सर हा रोगावर उपचार नाही. हा रोग झालेल्या व्यक्तींचा लवकरात लवकर मृत्यू होतो. अशी लोकांची चुकीची धारणा आहे. कॅन्सर 100 टक्के बरा होऊ शकतो. फक्त या रोगाचे योग्य वेळी निदान होणे व यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. असे…

रात्री चालला वेगळाच खेळ, तरुणीने मागितली ठाणेदारांनाच खंडणी

विवेक तोटेवार, वणी: पेढे वाटल्यामुळे गुन्हा दाखल केल्याने वादग्रस्त ठरलेले वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे सध्या वेगळ्याच प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. वणीत रात्री वेगळाच खेळ चालला. एका तरुणीने खाडे यांना मध्यरात्री खंडणी मागितल्याने…

विठ्ठलवाडीत खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन

विलास ताजने, वणी: वणी येथील विठ्ठलवाडी परिसरात दि. १८ ते २० जानेवारी दरम्यान जगन्नाथ बाबा गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जानेवारीला सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे उद्दघाटन नगर परिषदेचे अध्यक्ष…

शनिवारी वणीत स्केटिंग रेस स्पर्धा

विवेक तोटेवार, वणी: वणीत शनिवारी कँसरविषयी जनजागृती करण्यासाठी रोड रोलर स्केंटिंग चॅम्पियशीप 2019 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला सकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे. टिळक चौक ते लोकमान्य टिळक महाविद्यालयपर्यंत स्केटिंग ट्रॅक…

उद्या वणीत बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या समस्येविरोधात विराट मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: शेतकरी व युवकांच्या समस्येविरोधात वणीत उद्या 18 जानेवारी शुक्रवारला 'युवा शक्ती' द्वारे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा वणीतील शासकीय मैदानावरून निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व ऍड सूरज महारतळे करणार आहेत.…

शिवसेनेचे आंदोलन चिघळले, रास्ता रोको व टायरची जाळपोळ

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील कोळसा खाणीत स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बेमुदत उपोषणाला सुरूवात झाली. आज उपोषणाच्या दुस-या दिवशी हे आंदोलन चिघळले. दुपारी अचानक शिवसैनिकांनी आक्रमक रूप धारण करत रास्ता रोको केला.…

विजेचा धक्का लागून दिलीप गोहोकार यांचा मृत्यू

विलास ताजने, वणी : वणी येथील जिजाऊ नगर मध्ये बांधकाम चालू असलेल्या घरी विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १४ सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दिलीप दादाजी गोहोकार वय ४३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.…

वणीत शनिवारी कँसर रोगनिदान तपासणी शिबिर

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये दिनांक 19 जानेवारीला शनिवारी कँसर रोग तपासणी शिबिर व मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले आहे. आहे. सर्वसामान्य लोकांना कँसरबाबत माहिती मिळावी व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टिट्यूट…

राजूर येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉ. येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात या निमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या…

गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत…