विवेक तोटेवार, वणी: 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्षांच्या दिवशी मंगळवारी विद्युत कंत्राटदार असोसिएशन यवतमाळद्वारे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती विद्युत निरीक्षक मो रा बोध यांची होती. दुपारी 12 वाजता वणीतील एस बी हॉल येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात विद्युत महामंडळाचे कर्मचारी, कंत्राटदार व लाईनमन मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात विधुत विभागाद्वारे विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. विद्युत निरीक्षक मो.रा. बोध कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विधुत उपकरणाचा आदर करा की ज्यामुळे अपघात होणार नाही. लाईन चालू बंद करताना किंवा सुधारताना लाईनमनाने सुरक्षा साधने आपणच ठेवली पाहिजे. कारण सुरक्षा सर्वात महत्वाची असते. जीवित हानि झाल्यास खूप दुःख होते त्याच्या कुटुंबाचे छत्र हरविल्या जाते. ज्यामुळे सर्वात अधिक त्रास त्याच्या कुटुंबास सहन करावा लागतो. हे त्यांनी पांढरकवडा, दारव्हा, वणी येथील वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिले.
पुढे ते म्हणाले की फिटर बंद असले तरी पावसाळ्यात दक्षता घेणे आवश्यक असते. वेळ लागला तरी चालेल गडबड केल्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याकरिता लाईनमनाने ग्राहकांना समजावून सांगणे आवशक असते कारण त्यांचे म्हणणे ग्राहक ऐकत असतो त्याचे आणि ग्राहकाचे संबंध जवळीकतेचे असतात.
त्यानंतर इवनाते साहेब यांनी विद्युत अपघात का होतात याबाबत मार्गदर्शन केले. मडावी साहेब सुरक्षा सप्ताहाचे पालन करणे. उपस्थित लाईनमनाने आपले मनोगत व्यक्त केले. उप अभियंता राऊत साहेब आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलले की प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताहाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र्रात आपण घेत असतो. जनतेला जागृत करणे विधुत अपघात टाळण्यासाठी आवशक आहे, परंतु महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचेच अपघात होत असतात. माहिती देणे हे आपले काम आहे. जीव गेल्यावर मिळणारी मदत ही त्या व्यक्तीची कमतरता भरून काढू शकत नाही. महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात लाईनमनला दक्षता घेणे आवश्यक असते. काम हे काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कुटुंबाचा विचार करावा.
या कार्यक्रमाचे संचालन सचिन नागपुरे यांनी तर आभार अभियंता वासेकर यांनी मानले. कार्यक्रमास कंत्राटदार अजित क्षीरसागर, जयराज चव्हाण, शहबाज खान, सचिन बिलोरिया व विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.