तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 51 बैलांची सुटका

पाटण ठाणेदार व कर्मचाऱ्यांची मोठी कार्यवाही

0

सुशील ओझा, झरी: तेलंगणात तस्करीसाठी पायदळ घेऊन जाणा-या 51 बैलांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवनिर्वाचित ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही सर्वात मोठी कार्यवाही आहे.

सध्या पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गाय, बैल व म्हशींची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वेळोवेळी पाठपुरावा करून अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्सनास ही बाब आणून दिली आहे. याच अनुषंगाने नवनिर्वाचित ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी जनावर तस्करीवर पाश आवळण्याच्या तयारीला लागले आहे. 14 मार्चला ठाणेदारांना रात्री जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

रात्री 12 वाजताच्या दरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांसह पोलीस वाहन घेऊन पाळत बसले होते. त्यावेळी घाटातून पायदळ 51 जनावरे तेलंगणात तस्करी करीता नेत असल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांनी सदर जनावराबाबत माहिती घेतली असता जनावरे कत्तलीकरिता तेलंगणात नेत असल्याची माहिती समोर आली. सर्व ५१ जनावरे पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर तस्करीतील जनावरे दुर्भा येथील श्रीकृष्ण गौरक्षण मध्ये ठेवण्यात आले.

सदर जनावरे उमरी येथील आसिफ कुरेशी यांची असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये जनावर मालक आसिफ रऊप कुरेसी रा. मारेगाव, संदीप रघुनाथ पवार, गोरख भगत शिंदे, निलेश राजू राठोड, मोतीलाल उर्फ लाला तातेराव शिंदे, बबलू भाऊराव पवार सर्व राहणार वागदा ता. केळापूर तसेच शंकर रामकृष्ण मेश्राम, बाबूलाल आनंदराव गेडाम रा. झरी यांना अटक केली आहे. या जनावरांची किंमत 6 लाख 12 हजार असून पाटण ठाण्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही करण्यात आली.

यापूर्वीचे ठाणेदार व पीएसआयच्या काळात खुलेआम जनावर तस्करी सुरू होती. प्रत्येक मोठ्या चारचाकी वाहनाकडून 6 हजार रुपये प्रमाणे घेऊन वाहने सोडण्यात येत होते. ज्यामुळे जनावर तस्करी, गुटखा, गांजा, गौमास याची तस्करी केली जायची. जनावर तस्कर मारेगाव, उमरी, बोरी (पाटण) झरी, कळंब वरोरा, राळेगाव, वणी, पांढरकवडा व इतर गावातील असून वरील गावातील सर्व तस्करांच्या नावासह ‘वणी बहुगुणी’ने बातमी प्रकाशित केली होती.

यावरूनच वरीष्ठ अधिकारी व पथकांनी छापलेल्या नावाच्या तस्करांवर कार्यवाहीसुद्धा केली आहे हे विशेष. अमोल बारापात्रे यांनी पाटण ठाण्याचा पदभार घेताच यांनी कार्यवाहीचा सपाटा लावला आहे. ही कार्यवाही ठाणेदार अमोल बारापात्रे सह पीएसआय गणेश मोरे, जमादार श्यामसुंदर रायके, रमेश मेश्राम व संतोष खापणे यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.