महिलेच्या गळ्यातील चैन चोरी प्रकरणी आरोपीला पोलिसांचे पाठबळ?
एक महिना लोटूनही आरोपीला अटक नाही
वणी: येथील शिवाजी चौक वॉर्ड क्र ४ येथे राहणारी कुमकुम ओझा नामक महिलेच्या ६ वर्षीय पलक नामक मुलीला घर शेजारी राहणारा सुमित नंदू गायकवाड याने २२ फेब्रुवारी च्या दुपारी १२.३० वाजता दरम्यान दुचाकीने धडक दिली. ज्यामुळे मुलगीच्या ओठाला मार लागला व ती रडत घरी आली व आपल्या आईला सुमितने दुचाकीने धडक मारल्याचे सांगितले यावरून मुलीच्या आईने बाहेर निघून बघितले असता सुमित हा दुचाकी घेऊन येत होता.
यावेळी मुलीच्या आईने दिसत नाही का असे विचारले असता सुमित घरात घरात आला व त्याने वाद घालून केस ओढून थापड बुक्यांनी मारहाण केली व गळ्यातली एक तोळ्यांची सोन्याची चैन तोडून नेली. त्यावेळी त्याची आई आशा गायकवाड सुद्धा सोबत होती. ती सुद्धा अश्लील शिवीगाळ करीत होती व याबाबत कुणालाही सांगितले तर जिवाने ठार मारू अशी धमकी दिली व घरून यावरून कुमकूम ओझा हिने पोलीस स्टेशन ला तक्रार येऊन दिली यावरून पोलिसांनी कलम ३९२, ४५२, ५०४, ५०६, ३२४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेला महिना लोटला तरी आरोपींना पोलिसांनी अजूनही अटक केली नाही. ज्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.नियमाने पोलिसांनी चैनचोरीच्या गुन्ह्यात आरोपींना त्वरित अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यात चैन रिकव्हरी करावे लागते तसेच ज्या दुचाकीने धडक मारली ती जप्त करणे आवश्यक आहे. तसेच दुचाकी चालकांजवळ लायसन्स नसेल तर अजून दुसरे गुन्हे दाखल करावे लागते.
एवढे असूनही पोलिसांनी अजूनपर्यंत आरोपीची साधी विचारपूस सुद्धा केली नसल्याचे कळते. अश्या गंभीर गुन्ह्यात पोलीस आरोपींना का अटक केली नाही. आरोपी अटक न करण्यामागे पोलिसांचेच पाठबळ असल्याचे बोलले जात असल्याचा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.