शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

नागेश रायपुरे ,मारेगाव: एकात्मिक फलोऊत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2019/20 साठी शेतकऱ्यांना विविध योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि विभाग मारेगाव यांनी केले आहे.

यामध्ये ट्रेक्टर, शेततळे अस्तरीरण (कागद), कांदाचाळ, हरितगृह उभारणी, शेडनेट, लहान रोपवाटिका, पावर टिलर, प्लास्टिक मल्चिंग, शितखोली पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरजीवन, सामुहिक शेततळे(फक्त अनुसूचित जाती/जमाती करिता), फळबाग लागवड (ङालिंब,लिम्बु,संत्रा,आंबा).आदी योजने साठी अर्ज मगविण्यात येत आहे.

याकरीता सात बारा,आठ अ-नमूना,आधार कार्ड,बैंक पास बुक,फोटो हे आवश्यक कगदपत्र लागत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल आहे.करिता तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाणी या योजने चा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार, कृषी सहाय्यक डी.ए.गाडगे यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.