वर्षभरापासून फरार असलेला आरोपी गजाआड

बाललैंगिक, विनयभंग व इतर गुन्हे दाखल

0

सुशील ओझा, झरी: विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीला मुकुटबन पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होता. झरी तालुक्यातील अडेगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुकुटबन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. अखेर १६ मे रोज सदर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

माहिती नुसार १६ मे २०१८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान अडेगाव येथील एक अल्पवयीन मूलगी घरून शेतात शौचास जात होती. दरम्यान गावातील गंगाधर बोधे यांच्या शेतात काम करणारा मजूर विठ्ठल पुंजार उर्फ मारोती वाळके वय ३० वर्ष हा मुलीचा पाठलाग करत तिच्या जवळ आला व बाहेर चल अशी गळ घालू लागला.

सदर प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आपल्या भावाला फोन लावून बोलाविले असता आरोपी पळून गेला. पण त्यानंतर पुन्हा थोड्यावेळात येऊन आरोपीने सदर मुलीची छेड काढली. काही वेळाने मुलीचे आई वडील घटनास्थळी आले असता मुलीने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. या प्रकऱणी मुलगी आई वडील मुकुटबन पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार नोंदविली. यावरून पोलिसांनी आरोपी पुंजार उर्फ मारोती वाळके रा.दहेगाव ता. माहूर जी.नांदेड यांच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(ड) व बाल लैंगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती होताच आरोपी गाव सोडून फरार झाला. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर वर्षभरानंतर सदर आरोपीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितीन चुलपार, ए. एस. आय पुरूषोत्तम घोडाम व जमादार मोहन कुडमेथे हे आरोपीला अटक करण्यास गेले.

आरोपीला १५ मे रोजी सकाळी पोलिसांनी नांदेड जिल्यातील दहेगाव येथे जाऊन अटक केली. रात्री ११ वाजता आरोपीला घेऊन पोलीस पथक मुकुटबनला पोहोचलं. विशेष म्हणजे सदर आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून तो नेहमी आपल्या सोबत चाकू घेऊनच राहत असल्याची माहिती नांदेड जिल्यातील पोलिसांनी दिल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.