अवजड वाहनामुुळे शहरातील रस्ते खराब

कारवाई करणार कोण ? जनतेचा सवाल

0
विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहनांचा शिरकाव वाढल्याने रस्त्याची दैना होत आहे. सोमवारी अशाच प्रकारचा एक 18 चाकी वाहन नृसिंह व्यायाम शाळेजवळून गेल्याने तिथला रस्ता पूर्ण उखडला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबत माहिती देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
शहरात अवजड वाहने आणण्यास बंदी असतानादेखील अनेक वाहने बेदकारपणे वणीतील रस्त्यावर धावताना दिसत आहेत. सोमवारी अशाच प्रकारचे एक अठरा चाकी वाहन क्रमांक (MH-40N-5305) दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास वणीतील नृसिह व्यायाम शाळेजवळ आले. या वाहनात कृषि संबंधित साहित्य होते. सदर काही साहित्य दुकानात उतरवून वाहन मागे घेण्यास चालणे सुरवात केली. यावेळी वाहनात 30 टनाच्या जवळपास माल असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळे या वाहनाच्या चाकाने रस्ता पूर्णपणे उखडला गेला.

परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पोटे यांनी याबाबतची माहिती भ्रमणध्वनीवरून मुख्याधिकारी यांना यांनी दिली. परंतु बाहेरगावी असल्याचे सांगून मुख्याधिकार्यांनी या कडे दुर्लक्ष केले. सोबतच कर्मचारी घटनास्थळी पाठवतो म्हणूनही सांगितले परंतु कुणीही फिरकले नाही. त्यानंतर सदर माहिती वाहतूक शाखेलाही देण्यात आली. वाहतूक शाखेचे कर्मचारी या ठिकाणी आले व त्यांनी गाडी व गाडीची कागदपत्रे वाहतूक शाखेत जमा करण्यास सांगितले. परंतु त्या ठिकाणी कुणीही भटकळ नाही. वाहतूक शाखेची अनेक प्रकरणे आहे. जनतेची मालमत्ता समजल्या जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा होत आहे. याबाबत कोणतेही प्रशासन जागे नसल्याने सुजग नागरिकात प्रशासनाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.