विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर येथून लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यानी 13 जून रोजी रात्री 11 वाजता वाटिका बारजवळ गोंधळ घालून एक इसमास मारहाण केल्याची घटना घडली. या दोघांनीही एकमेकांविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्धही विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, 13 जूनला वणी येथे चंद्रपूर येथील वैभव उद्दरवार यांचा विवाह सोहळा होता. त्याकरिता त्याचे मित्र दारू पिण्याकरिता वाटिक बार येथे आले. फिर्यादी चंद्रकांत बापूजी पिंपलकर (31) यांच्या तक्रारीवरून गाडी लावण्यावरून वाद झाल्याने त्यांना एक इसमाने मारहाण केली. ज्या मारहाणीत त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर जखम झाली. सोबतच जीवे मारण्याचीही धमकी दिली. अशी तक्रार चंद्रकांत यांनी दिली त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीवर कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे.
याचवेळी चंद्रकांत पिंपलकर यांच्याविरुद्ध मोहमद हनिफ मोहमद इब्राहिम (60) यांनी मारहाणीची तक्रार दिली आहे. मोहमद इब्राहिम यांचे आशीर्वाद बारच्या मागे मशिनरीजचे दुकान आहे. 13 जूनला रात्री 11 वाजता चार ते पाच इसम दारू पिऊन त्यांच्या दुकानासमोर वाद घालीत होते. काय झाले म्हणून मोहमद बघण्याकरिता गेले असता त्यांच्या गालावर पिंपळकर या इसमाने विनाकारण मारले व जीवे मारण्याची धमकी दिली. मोहमद यांच्या तक्रारीवरून पिंपलकर यांच्यावर कलम 143, 323, 504, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेचा तपास पोऊनी विजयमाला रिठे करीत आहे.