मुंगोली कोळसा खाण क्षेत्रात अपघात

वेकोलीच्या तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू

0 661

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाण परिसरात व्हील डोझर खाली दबून मंगळवारी सायंकाळी तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश महतो वय ४५ असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे. 

सदर कोळसा खाण परिसरातील कोल स्टॉक क्षेत्रात व्हील डोझरने रस्ता निर्मितीचे काम चालू होते. यावेळी अधिकारी महतो सदर कामाची देखरेख करीत होते. यादरम्यान गणेश महतो हे डोझरच्या खाली दबून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Loading...