मुकूटबन-येडसी मार्गावरील जड वाहतूक त्वरित बंद करा

ग्रामपंचायतची पोलीस स्टेशनला तक्रार

0
सुशील ओझा, झरी: मुकूटबन ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद अंतर्गत बनविलेला मुकूटबन ते येडसी या मार्गावरील सिमेंट कंपनीची होणारी जड वाहतूक त्वरित बंद करण्याची तक्रार करण्यात आली आहे. मुकूटबन येथे आर .सी .सी .पी. एल एमपी बिर्ला कंपनीचे सिमेंट प्लांटचे काम झपाट्याने सुरू आहे. सिमेंट कंपनी मध्ये दिवसरात्र जड वाहतून गावातील असलेल्या येडसी मार्गाने सुरू आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉलनी असून जड वाहतुकीच्या वाहनाने लहान व शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या मार्गाची वाहतूक मर्यादा ८० ते १०० टन असून कंपनीच्या ८० ते १०० टन असलेल्या जड वाहतूक केली जात आहे ज्यामुळे सदर मार्गाची दयनीय अवस्था झाली असून जडवाहतुकीने रस्त्यावर मोठे मोठे गड्डे सुद्धा पडले आहे. ज्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
सिमेंट कंपनी चे ओव्हरलोड ट्रक सुसाट वेगाने धावत असल्यामुळे मोठे अपघात घडून गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ होणार असल्याचे तक्रारीतून करण्यात आला आहे. ग्रामपंचायतने यापूर्वी पोलीस स्टेशनला ओव्हरलोड व जड वाहतूक बंद करण्याबाबत तक्रार केली होती परंतु सदर तक्रारींवर पोलिसकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी सिमेंट कंपनीचे मनमानी कारभार सुरू आहे.
सिमेंट कंपनी ही शासकीय नियमाला न जुमानता ग्रामपंचायत तथा ग्रामवासीयांना कोणत्याही प्रकारे सहकार्य न करता दिवसरात्र ओवरलोड वाहतूक करीत आहे.तरी पोलिसांनी सदर जीवघेणी ओव्हरलोड वाहतूकीवर कायद्यानुसार कार्यवाही करून भविष्यात कोणतीही गंभीर दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.