सुरपाम व तिराणकर मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा
विविध आदिवासी संघटनांचे एसडीपीओंना निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असून यात पोलिसांचा सहभागी असल्याने पोलीस या प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचा आरोप विविध आदिवासी संघटनांनी करून, दोषी पोलीस अधिकारी वर व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावे, तसेच या प्रकरणाची व धीरज तिराणकर मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे द्यावी अशी मागणी विविध आदिवासी संघटनांनी केली. यासंदर्भात सोमवारी दिनांक 1 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील विरूळ गाडेगाव मारोती सुरपाम हा कौटुंबिक कौटुंबिक तक्रार घेऊन दिनांक 25 जूनला वणी पोलीस स्टेशनला आला होता. त्याने विष प्राशन केले त्यात त्याचा मृत्यू झाला होता मात्र त्याचा मृत्यू विष घेतल्याने झाला नसून पोलिसांच्या मारहाणीत झालेला आहे असा आरोप काही आदिवासी संघटनांनी केला आहे.
दिनांक एक 27 जून ला येतील धीरज तिराणकर या तरुणाला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. मात्र हा अपघात असून हा घातपात असल्याचा आरोप धीरजची आई सुनंदा तिरणकर यांनी केला आहे. त्याला इतरत्र मारण्यात आले असून त्याला मृतावस्थेतच ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले व मारेक-यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव केला असा आरोप धीरजच्या आईने केला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल धुर्वे म्हणाले की…
पोलीस या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करत नाही. हे प्रकरण पोलिसांशी जुळले असल्याने पोलीस या प्रकऱणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे द्यावे अशी प्रतिक्रिया स्वप्निल धुर्वे यांनी दिली.