वीज वितरणच्या उपअभियंत्यांची बदली रद्द

अखेर लोकआग्रहापुढे झुकले प्रशासन

0
सुशील ओझा, झरी: आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार उपअभियंता राहुल पावडे सुरळीत चालवित असताना त्यांची अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमतातून उमरखेडमध्ये बदली केली होती. मात्र, यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याने पावडे यांची बदली रद्द करण्यात आली आहे..
पूर्वी तालुक्यात पाटण व मुकुटबन येथेच सबस्टेशन होते. या दोन सबस्टेशनवरूनच तालुक्यातील १०६ गावांना वीजपुरवठा केला जात होता. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कृषिपंप, लहान उद्योग, घरगुती वापर यामुळे दोन्ही सबस्टेशनवर लोड वाढत असल्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत होता. कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतातील पंप चालू शकत नव्हते. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
जनतेचे विद्युत पुरवठ्यावर चालणारे उपकरणे जळणे, लहान व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होते. ग्रामपंचायत पातळीवरील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. पिठगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. अशा परिस्थितीत पावडे यांनी पदभार स्वीकारून सदर प्रश्न निकाली काढले. अडेगाव, झरी, हिवरा बारसा या तीनही गावात सबस्टेशन मंजूर करून सुरू केले. यामुळे पाटण व मुकुटबन सबस्टेशनवरील विद्युतभार कमी झाला.
तालुक्यातील सर्व सबस्टेशन सुरळीत चालावे याकरिता त्यांनी वणी ते कायर, कायर ते मुकुटबन, शिंदोला ते अडेगाव, कायर ते घोन्सा, पाटण ते झरी, बोरी ते पाटण या सर्व लाइन वेगवेगळ्या करून सबस्टेशन सुरू केले. एका लाइनवर बिगाड आल्यास सर्कल बंद राहणार नाही, अशी व्यवस्था केली. .
वणी ते कायर, मुकुटबन व बोरी ते पाटण या ३३ केव्ही लाइनवर तालुक्यातील १०६ गावांचा विद्युत पुरवठा होत असून, दोन्हीकडील लाइनचे काम सुरळीत केले. दरम्यान, त्यांच्या प्रामाणिक कामामुळे लाचखोर अधिकारी व कंत्राटदाराना मलिदा लाटता येत नव्हता. त्यातूनच खोटी माहिती देऊन पावडे यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर उमरखेड येथे त्यांची बदली झाली. यामुळे तालुकावासीयांनी बदलीविरोधात दंड थोपटले होते. जनतेचा रोष पाहून वरिष्ठांनी पावडे यांची बदली रद्द केली..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.