बहुगुणी डेस्क, वणी: शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून अनेक कलावंताना या शहरातून नावलौकिक मिळाला आहे. अनेक नाट्य चळवळ शहरात होती. वणीतील कलावंत नाट्य कलेत पारंगत होती. मागील काही वर्षे पासून नाट्य चळवळ थांबली होती. पुन्हा या नाट्य कलेला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस वेलफेअर असो असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार यांनी व्यक्त केली. ते नगर परिषद शाळा क्र. 5 मध्ये नवीन नाटकाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
मागील 5 वर्षापासून सागर मुने यांनी सागर झेप या नाट्य चळवळ सुरू केल्याने नाटकाला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. ते पुढे म्हणाले तसेच बाल नाट्याची सुरुवात केल्याने यातूनच नवीन कलावंत तयार होईल व त्यांना दूरदर्शन वरील मालिकेत, चित्रपटात काम करण्याची संधी सुद्धा मिळेल. त्यासाठी सागरझेप संस्थेच्या सर्व कलावंतांनी असेच उत्तम अभिनय करून वणीचे नाव भारतात करावे असे मत व्यक्त केले.
या वेळी जेष्ठ कलावंत अशोक सोनटक्के, नीलिमा काळे यांनी उपस्थित कलावंतांना मार्गदर्शन केले. या नंतर रुपाली सालकाडे हिने अथर्वशीर्ष पठण घेतले व त्याचे नाटकात काम करण्यासाठी किती महत्व आहे सांगितले. या नंतर नाटकाची तालीम सुरू झाली. दर शनिवारी रविवारी शाळा क्र 5 मध्ये बाल नाट्य व महिला नाट्यकाची तालीम होणार आहे. यात वणीतील महिलांना व मूल मुली याना शिकायचे असेल किंवा सहभाग घ्यायचा असल्यास संस्थेशी संपर्क करावा असे संस्थेच्या अध्यक्ष सागर मुने यांनी म्हटले आहे.
या वेळी प्रवीण सातपुते, राणी हांडे, शंतनू मुने, शंकर घुगरे, निकुंज सातपुते, गौरी सोनटक्के, कविता सातपुते, सोनल टिकले, शंतनू आंबोरकर, प्रणय मुने, निकिता बोबडे, कल्पना आंबोरकर, साक्षी खुसपुरे व संस्थेचे सर्व सदस्य कलावंत उपस्थित होते.