बोटोणीमध्ये आज नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

0

जयप्रकाश वनकर, बोटोणी: मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत चिंचोनी बोटोणी चे वतीने येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक १६/०७/२०१९ रोज मंगळवार ला सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शासणाच्या विविध उपक्रमा अंतर्गत ग्राम पंचायत ला ग्राम विकास निधी प्राप्त होत असतो. त्यात १४ वित्त आयोग ,पेसा अंतर्गत शिक्षण,आरोग्य अपंग, महिला बाल कल्याण, मागासवर्गीय विकास करण्याचे उपयोजना असल्याने ग्राम पंचायत बोतोनी च्या वतीने १४ वित्त आयोग अंतर्गत अद्विका सामाजिक बहुउदेषीय संस्थे द्वारे ग्राम पंचयात स्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरास बोटोनी व बोटोनी अंतर्गत येत असलेल्या पोड वस्त्या मध्ये वास्तव्यास असलेल्या जनतेला शिबिराचा लाभ घेता येणार आहे. पांढरकवडा येथील डॉ. चव्हाण आणि त्यांची टीम शिबिरामध्ये उपचार करणार असून शिबिरामध्ये गरजूंना चष्मे वाटप त्याच बरोबर औषधींचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.