सुशील ओझा, झरी: मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संजय देरकर यांची पाटण येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 1 वाजता झालेल्या या बैठकीत पाटण सर्कलमधले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत संजय देरकर यांनी पाटण सर्कलचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच बुथबांधणी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना संजय देरकर म्हणाले की आता निवड निवडणुकीला केवळ काही दिवस शिल्लक आहेत. कार्यकर्त्यांनी आतापासून बुथ बांधणीच्या कामाला लागायला हवे. बुथ प्रमुखांनी बुथ कमिटी तयार करावी तसेच लोकांशी संपर्क साधून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आगामी विधासभा निवडणूक लढण्याचा निश्चय झाला असल्याने कार्यकर्त्यांनी लगेच कामाला लागणे गरजेचे आहे, असा आदेश संजय देरकर यांनी दिला.
या बैठकीत पाटण सर्कलमधल्या कार्यकर्त्यांनीही आपल्या गावातील समस्या मांडून त्यावर चर्चा केली. यावेळी अशोक पाईलवार, गजानन खोबरे, रमेश चिटलावार, राजू ईदे, विनोद भाऊ यांच्यासह पाटण सर्कलमधले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.