वणीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

जय सेवा, बिरसा मुंडा यांच्या जयघोषांनी परिसर दणाणला

0

विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत विविध सामाजिक संघटनेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेली बाईक रॅली प्रमुख आकर्षण ठरले. यात शेकडो बाईक चालक सहभागी झाले होते. जय सेवा व बिरसा मुंडा की जय, बिरसा मुंडा अमर रहे या जयघोषांनी परिसर दणाणून गेला. तर दुपारी रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 9 वाजता पाण्याच्या टाकीजवळील भिमालपेन देवस्थान येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. ही रॅली टिळक चौक ते जिजाऊ चौक चिखलगाव, लोकमान्य टिळक महाविद्यालय, गांधी चौक, दिपक टॉकीज, आंबेडकर चौक या प्रमुख मार्गाने निघाली. रॅलीचा समारोप भिमालपेन देवस्थान इथे झाला.

रॅलीनंतर दुपारी 11 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. वणीतील लोढा व सुगम हॉस्पिटलच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले. यात 150 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला एक टिशर्ट, प्रमाणपत्र व डोनर कार्ड वाटण्यात आले. दुपारी 12 वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात झाली. डॉ. महेंद्र लोढा आणि त्यांच्या चमुने यावेळी रुग्णांची तपासणी केली.

डॉ. वीणा चवरडोल, सर्जरी तज्ज्ञ डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, हृद्यरोग व मधुमेहासाठी डॉ. गणेश लिमजे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, डॉ. दिलिप सावनेर, भूलतज्ज्ञ डॉ. शिरीष कुमरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जुमनाके, डॉ. ठाकरे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. अमोल पदलमवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रीती खाडे, डॉ. पल्लवी पदलमवार, नाक कान घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी आणि उपचार केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषद, ऑल इंडिया एससी एसटी ओबीसी कॉन्सिल ऑल इंडिया, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन वणी, आदिवासी विकास परिषद, गोंडवाना टायगर सेना, गोंडवाना संग्राम परिषद, गोंडवाना अस्मिता परिवार, आदिवासी एकता विचार मंच भीमनगर, आदिवासी समिती दामले फैल, आदिवासी जनजागृती युवा संघटना राजुर, बिरसा मुंडा समिती खांदला, बोरगाव, शिरपूर यासह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.