विवेक तोटेवार, वणी: वणीतील अशोक कटारिया यांच्या घरी 15 ऑगस्ट रोजी किरकोळ वस्तू चोरी करताना पाच विधीसंघर्ष बालकांना त्यांनी व त्यांच्या शेजाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. यातील दोघे मुले पसार होण्यात यशस्वी झाले. पकडण्यात आलेल्या पाचही आरोपींवर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हेगारांना यवतमाळ येथील बालन्यायालयात हजर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
अशोक कटारिया यांचे तलावरोड येथे ए के इंटरप्राइजेस नावाचे सिमेंटचे दुकान आहे. 14 ऑगस्ट बुधवार रोजी काही लहान मुले त्यांच्या घरी येऊन दोन पितळी गुंड, एक पितळी परात असा पाच हजार रुपयांचा ऐवज घेऊन जाताना दिसली. त्यांना अशोक कटारिया यांनी त्याच्या शेजाऱ्यांच्या मदतीने पकडून समजावले व लहान मुले आहेत म्हणून सोडून दिले.
परंतु दुसर्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अशोक कटारिया यांच्या घरी हीच सात मुले पुन्हा चोरी करताना आढळून आले. त्या दिवशी बाजार बंद असल्याने अशोक कटारिया हे घरीच होते. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली व त्यांच्या मदतीने त्या सातही मुलांना अशोक कटारिया व त्यांच्या शेजाऱ्यांनी ताब्यात घेतले. परंतु त्यातील दोन मुले पळून जाण्याचा यशस्वी झाली. या पाचही जणांना त्यांनी पोलीस ठाण्यात आणले व त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी या पाचही जणांवर कलम 279, 511, 34 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव करीत आहे. त्यांना आज 16 ऑगस्ट रोजी बाल न्यायालयात बाल न्यायालय यवतमाळ येथे हजर करण्यात आले होते. त्यांना त्या पाचही विधीसंघर्ष गुन्हेगारांना बालसुधारगृहात टाकण्यात येईल असा अंदाज आहे.
यातील काही जण हे गंभीर स्वरूपाचे नशा करीत असल्याचे समोर आले आहे. ही मुले वणीतील एमआयडीसी रोडवर उभी राहून ये-जा करणाऱ्यांना लुटत असल्याची माहिती आहे. परंतु पोलिसात कुणीही येऊन तक्रार दाखल न केल्याने ही मुले वाईट मार्गी लागली.