सुशील ओझा, झरी: गेल्या सात वर्षांपासून सर्व संगणक परीचालक महाराष्ट्र राज्यात विविध मागण्याकरिता लढा देत आहे. परंतु अजूनही सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य झाल्या नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्वच संगणक परिचालक काम बंद करीत आहेत. याचं अनुषंगाने तालुक्यातूनही निवेदन देऊन पंचायत समिती स्तरावर मागण्या सोडवण्याची विनंती करण्यात आली आहे.
या मागणीत राज्यातील संगणक परिचालक यांना शासनाच्या आयटी विभागात कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, आजपर्यंतचे थकीत सर्व मानधन देण्यात यावे, जिल्ह्यात अजूनही आर. टी. जी. एस (RTGS) न केलेल्या ग्रामपंचायतीची सुनावणी लावून तात्काळ आरटीजिएस ( RTGS) करणे, तसेच ऑनलाइन कामे करताना संगणका परीचालकांना ग्रामपंचायत मध्ये इंटरनेट नाही, नेट कनेक्टिविटीज नसणे, नेट करिता रिचार्ज करून न मिळणे अशा मोठ्या अडचणी येतात.
या सर्व समस्या त्वरित सोडविण्याच्या मागणीचे निवेदन झरी संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष राहुल दांडेकर, प्रवीण गुरनुले, तुकाराम भोसकर, अनिल गुर्लावार, संदीप डहाके, महेश कावटवार व महेश मांडवकर यांनी गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना दिले.