वर्षा किडे कुळकर्णींंना सूर्योदय कथासाहित्य पुरस्कार प्रदान

ठरल्या विदर्भाच्या एकमेव साहित्यिक प्रतिनिधी

0

बहुगुणी डेस्क, नागपूर: सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगावच्या वतीने मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमीत्त श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय पंधराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात नागपूरच्या साहित्यिक वर्षा किडे कुळकर्णी यांंना राज्यस्तरीय सूर्योदय कथासाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ‘झिरो मॅरेज ‘या त्यांच्या साहित्यकृतीला (कथासंग्रह) किसान कवी स्व. चिमणराव ठाकरे स्मरणार्थ हा राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार देण्यात आला.

जळगावी जैन संघटनेच्या सभागृहात संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक प्रा डाॅ श्री सदानंद मोरे यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे महाकवी प्रा.डॉ सुधाकर गायधनी, संमेलनाच्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष खानदेशातील ग्रामीण कथा कादंबरीकार डॉ. संजीव गिरासे, सूर्योदय सर्व समावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, सेवादास दलुभाऊ जैन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वर्षा किडे कुळकर्णी यांना प्रदान करण्यात आला.गौरवपत्र व १००० रुपये रोख रकमेचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते .

पुरस्कारप्राप्त साहित्यिकांत वर्षा किडे कुळकर्णी यांनी नागपूर व विदर्भाचे प्रतिनिधित्व केले आहे ही महत्वाची अन विशेष बाब होय. ‘झिरो मॅरेज’ला वाड्.मय चर्चा मंडळ, बेळगावचा दर्जेदार, मानाचा साहित्य कथा पुरस्कार डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते नुकताच बेळगावला वर्षा किडे कुळकर्णी यांनी स्वीकारला आहे. संमेलनात सूर्योदय अन्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.