झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी “प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा” लाभ घेण्याचे आवाहन
तहसील कार्यालया तर्फे तीन दिवस विशेष मोहीमचे आयोजन
सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांची मान उंचावण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने “पंतप्रधान किसान मानधन योजना” लागू केली. प्रत्येक गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यापैकी ५०% शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी करायची आहे. त्या उद्देशाने २३,२४, व २५ ऑगस्टला तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी विशेष मोहीम तहसील कार्यालय व कृषी विभाग व पंचायत समिती तर्फे राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक व सामंत शेतकरी यांच्या करिता ही योजना आहे.
प्रत्येक गावातील शेकऱ्यांना या योजनेबाबत माहिती देणे, त्यांना जगरूक करावे तसेच इतर समाविष्ट गावांना मोहिमेबाबत माहिती द्यावे. तसेच तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी प्रत्येक गावात जाऊन या योजनेबाबत माहिती द्यावी. अवगत करावे. ग्रामपंचायत अंतर्गत शाळा, प्रार्थनास्थळ व इतर ठिकाणी वरील तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेकरिता तीन दिवसाकरिता नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली. तीन दिवस प्रत्येक गावाला भेटी देणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी इतर ठिकाणीही पात्र शेतकऱ्यांना माहिती देऊन व्यापक प्रमाणात नोंदणी करून घेण्याचे आदेश आहे.
पंतप्रधान किसान मानधन योजनेची सर्वस्वी जवाबदारी तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांची असून सामूहिक सह्या करून सम्पूर्ण मोहीम यशस्वीरीत्या पार पाडावी. तसेच सदर योजनेच्या कामात शासकीय कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची योजना लागू केली असून या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन नोंदणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केले आहे.