स्वाक्षरी दौ-याचा शनिवारी नवरगाव सर्कलचा दौरा
आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक स्वाक्षरी गोळा
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी मारेगाव तालुक्यातील नवरगाव सर्कलचा दौरा करण्यात आला. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात हे स्वाक्षरी अभियान सध्या सुरू आहे. यानिमित्त ठिकठिकाणी दौरे काढून चावडीवर, चौकात, पारावर लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीजदराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच 200 युनिट मोफत विजेच्या मागणीबाबत माहिती देण्यात येत आहे.
शनिवारी नवरगाव येथे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. यात नवरगाव, करणवाडी, संगनापूर, हिवरी, अर्जुनी, म्हैसदोडका, खन्नी, रोहपट, गोधणी, कान्हाळगाव, सुसरी, खैरगाव, टाकळखेडा, पेंढरी इत्यादी गावांचा दौरा करण्यात आला. यात गावातील चौकात स्टॉल लावून लोकांना या अभियानाची माहिती देऊन लोकांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या.
प्रा. संजय लव्हाळे, यशवंत डवरे, बंडू जोगी, सुधाकर काळे, तानाजी ढिवरकर, संजय करलुके, गजानन अवताडे, संजय कुळमेथे, विठ्ठल लोडे, विजय बदखल, प्रदीप पवार, विनोद लोंढे, दिलिप चौधरी यांच्यासह संजय देरकर यांचे समर्थक उपस्थित होते. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक स्वाक्षरी गोळा झाल्या असून सुमारे 1 लाख स्वाक्षरी गोळा करून त्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.