पोळ्यानिमित्त वणीत फुलला बाजार

सजावटीच्या वस्तुंची विशेष मागणी

0

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील बाजार फुलून गेला येणाऱ्या ‘बैल पोळा’ निमित्ताने. वर्षभर झटणाऱ्या बैलांसाठी… ‘सर्जा-राजा’ साठी बाजारात सर्व काही विसरत कष्टकरी, बळीराजाची गर्दी ओसांडत होती. सर्जा अन् राजाला माथवठी, कासरा, मोहरकी, मानाचे चवर, घोगर, लोकरीचा केसर, छंबी अन् गोंडा आणखी बरेच काही खरेदी केले जात होते. दुष्काळी परिस्थिती बाजूला ठेवून खरेदीला वेग येत आहे.

सर्व काही विसरत कष्टकरी, बळीराजाची गर्दी ओसांडत होती. सर्जा अन् राजाला माथवठी, कासरा, मोहरकी, मानाचे चवर, घोगर, लोकरीचा केसर, छंबी अन् गोंडा आणखी बरेच काही खरेदी केले जात होते.

शहरात एरवी दर आठवड्याला भरणारा तालुक्याचा आठवडे बाजार वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार येणाऱ्या ‘बैल पोळा’ निमित्त फुलला. आपल्याशी वर्षभर साथसंगत करणाऱ्या सर्जा अन् राजा अर्थातच काळ्या आईची कूस उजविणाऱ्या आपल्या साथीदाराचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची दुष्काळी परिस्थिती विसरून लगबग दिसत होती.

बैलांच्या अंगाला लावण्यासाठीचा काची रंग गुलाबी अन् हिरव्या रंगात तर भगवा, गुलाबी, हिरवा, पिवळा, नीळा, मोरपंखी आदी माती रंग शेतकरी खरेदी करताना दिसत होते. पोळा सणाला ‘गेरू’च महत्व आजही अनन्यसाधारण. चवर गेरुत रंगवीत आपल्या सर्जा अन् राजाच्या गळ्यात बांधण्याची आजही महाराष्ट्र मातीतील शेतकऱ्यांची पोळा सणाची परंपरा. ह्याच गेरूची विक्री होत होता. बैलांसाठी शिंगाच्या रंगाचा डबा छोट्या मोठ्या आकारानुसार, शिंगांचे गोंडे छोट्या आकारात, मध्यम तर सर्वात भारी बाजारात चित्र आहे. गळ्यात घालायचे गजरे रुपये, लोकरीचा केशर अन् त्यावर चमडा अन् बिब्बा लावलेले नग खरेदी केला जात आहे. बैलांच्या गळ्यात खणखणणारा घोगर तर शिंगावरील छंबी मिळत आहे.

बाजारात कासरा जोडी, मोहरकी ६० रुपये जोडी, आजही पोळ्याला बैलाच्या गळ्यात मानाचे पान समजले जाणारे चवर अर्थातच पळसाचे पान याची मोळी, घोगर, नाकातील वेसन, सर्जा-राजाच्या पायातील रंगीबेरंगी पैंजण, पोळा सणाला बैलांच्या डोक्यावरचा डामडौल अर्थातच माथवटी छोट्या-मोठ्या आकारात खरेदी केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.