रस्त्याने अडवला ग्रामवासियांचा रोजगार

ए्का तपाहून अधिक काळ लोटला प्रतीक्षेचा

0

सुशील ओझा, झरी: रस्ता बंद झाल्याने अनेकांचा रोजगार तुटला. पाटणबोरी ते पिंपळखुटी (रेल्वेस्टेशन) या अडीच किमी लांबीच्या रस्ता मंजूर झाला. मात्र सदर रस्त्याच्या कामाचा पंधरा वर्षापासून मुहुर्त मिळाला नाही. रस्त्या अभावी गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता झाल्यास रेल्वेस्टेशन ते पाटणबोरी पर्यंत वाहतूक सुरू झाल्यास ५० कुटुंबाना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. .

तत्कालीन आ. संदीप धुर्वे यांच्या कार्यकाळात पाटणबोरी ते पिंपळखुटी रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व शिवाजी मोघे यांच्याकडे गेले. त्यांच्या कार्यकाळात अनेकांनी पाठपुरावा केला, मात्र त्यांना यश आले नाही. विद्यमान आ.राजू तोडसाम यांनीही या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अडीच किमी अंतरामध्ये तीन पुलाचे काम करावे लागणार असून, त्यापैकी एकाही पुलाचे काम सुरू झाले नाही. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास या परिसरातील जनतेला रेल्वे सेवेसाठी अदिलाबादला जाण्याची गरज राहणार नाही. पिंपळखुटी येथे प्रत्येक रेल्वेला थांबा असून, या ठिकाणी गाड्या सुध्दा जास्त वेळ थांबतात. प्रत्येक नागरींकासाठी पिंपळखुटी रेल्वे स्थानक सोईचे होते. हा रस्ता पूर्ण झाल्यास २५ ऑटोरिक्षा या मार्गावर नियमीत चालू शकतील.

हॉटेलचा व्यवसाय सुरू झाल्यास ५० कुटुंबातील लोकांना आधार मिळू शकते. तसेच शेतकऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. या भागाचे खा. बाळू धानोरकर यांनी या रेल्वे स्टेशनला दोन्ही बाजुंनी प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्यास्थितीत त्या ठिकाणी रॅक पॉईन्ट आहे. .

या रेल्वेस्टेशनवरील कर्मचाऱ्यासाठी बांधलेल्या गेलेली घर मोडकळीस आलेली आहे. मागील वर्षी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शहारे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. त्यानंतर हा रस्ता डांबरीकरण ऐवजी खडीकरण जिल्हा नियोजन समीतीतुन मंजूर झाले असल्याचे येथील सरपंच, उपसरपंच यांनी सांगितले. याकडे या भागाचे आ. राजू तोडसाम, खा. बाळू धानोरकर, जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती गजानन बेंजकीवार यांनी प्रयत्न करून काम मार्गी लावावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.