कावड यात्रेस डॉ श्याम जाधव (नाईक) यांची भेट

0

कारंजा: श्रावण सोमवार निमित्त परिसरात कावड यात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. कारंजा, मानोरा व कोंडोली येथील कावड यात्रेस संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्ही.जे.एन.टी. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ श्याम जाधव (नाईक) यांनी भेट दिली. कावड यात्रेमधील सर्व युवकांसोबत डॉ श्याम जाधव यांनी सवांद साधला व कावड या कावड यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रावण सोमवारच्या मुहुर्तावर या कावड यात्रेला प्रारंभ झाला. कावड मंडळातर्फे कावड यात्रा आयोजित करण्यात येते. जय भोले कावड मंडळ मानोरा, सिद्धेश्वर कावड मंडळ कारंजा, महाकाल कावड मंडळ कोंडोली याद्वारे ही कावड यात्रा काढण्यात आली. श्रावण सोमवारी बंजारा काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी अशी कावड यात्रा काढली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.