खाकी वर्दी समाजहितासाठीच – नुरुल हसन

अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक यांची मारेगाव येते भेट

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मानव समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असून खाकी वर्दी हाच माझा धर्म आणि कर्त्यव्य आहे. असे नुकतेच यवतमाळ जिल्ह्याला लाभलेले युवकांचे प्रेरणास्थान आय. पी. एस. अधिकारी नुरुल हसन यांनी पोलीस स्टेशन मारेगाव येथे भेटीदरम्यान शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते.

या स्पर्धेच्या युगात जो खऱ्या अर्थाने परिश्रम करतो त्याला जीवनात त्याचा मेहनतीमुळे नक्की यश प्राप्त होते असे शहरातील युवकांना मार्गदर्शन करत बोलत होते. मारेगाव पोलीस स्टेशनला भेटी दरम्यान शांतता कमेटीच्या बैठकीत तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. तसेच गणेशोत्सव संदर्भात चर्चा केली. जर एखाद्या प्रकरणात कुणावर अन्याय होत असेल आणि पोलीस प्रशासना कडून करवाई होण्यास दिरंगाई होत असेल तर माझ्या मोबाईलवर संपर्क करावा असे आवाहनसुद्धा नुरुल हसन यांनी केले आहे.

पोलीस अधिकारी नुरुल हसन हे मारेगाव शहरात प्रथमच पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी येत असल्याची माहिती शहरातील युवकांना त्यांच्या स्वागता साठी एकच गर्दी केली होती. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनेसुद्धा त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी मंचावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नाईक, पोलीस निरीक्षक दिलीप वडगांवकर, पो. उपनिरीक्षक अमोल चौधरी व नितिन बलगिलवार उपस्तित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.