मांगली वार्ड क्र. 3 मधील रस्ता झाला गायब
रस्त्याच्या मागणीसाठी महिलांनी केली आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
संजय लेडांगे,मांगली: मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी मांगली वार्ड क्र.3 मधील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे राडा लावला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीन व दुर्लक्षित धोरणांमुळे या गंभीर बाबीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने ग्रामवासीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी थेट वणी विधानसभाक्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोतकूलवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
साधारणतः सण 2012-13 पासून वार्ड क्र.3 मधील रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली.यादरम्यान पावसाळ्यात सदर वार्डातील नागरिकांना व शाळकरी मुलांना घराबाहेर निघताना कमालीची अडचण निर्माण होत आहे. आजही रस्त्याच्या दयनीय व चिखलमय अवस्थेमुळे मांगली वसाहत ग्रामवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील रस्त्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र गावातील रस्ते चिखलमय व खड्यांनी माखलेला आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वातावरण दूषित होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहेत.
रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही मागणीला केराची टोपली दाखवली जात आहेत. पहिलेच कुंभकर्णी झोपेत पडलेल्या स्थानिक प्रशासनावर कुठलाच परिणाम होत नसल्याने अखेर महिलांनी थेट आमदारांची भेट घेऊन आपल्या वार्डातील रस्ता, पाणी आणि वाढीव वीज खांब उभारण्याच्या मागणीसह गावातील आदी समस्येचा फाढा निवेदनातून वाचून दाखवला.
यावेळी मांगली वार्ड क्र.3 मधील सुषमा सिडाम, अनिता भोकरे, नीलिमा शिरपूरकर, मनीषा सातघरे, ज्योत्स्ना भादीकर, मनीषा धोटे, ताई तलांडे यासह आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.