सामान्य माणसांचा असामान्य आदर्श म्हणजे कोठाळे – डॉ. अनिल बोंडे

इंजि. अविनाश कोठाळे सन्मान सोहळ्यात अमरावती येथे प्रतिपादन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सामान्यांसोबत राहून वेगळं काहीतरी करण्याचं धाडसं आजही अनेकजण करतात. अविनाश कोठाळे त्यांपैकीच एक. त्यांची काम करण्याची शैली ही अत्यंत प्रभावी आणि निराळी आहे. किंबहुना ते त्यांच्या कार्यामुळे सामान्य माणसांचे असामान्य आदर्श ठरतात. असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. मित्रपरिवाराने कोठाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील होते.

यावेळी विचारपीठावर या सोहळ्याचे उद्घाटक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, सार्वजनिक बांधकामाचे माजी मंत्री ना. प्रवीण पोटे पाटील, माजी खासदार अनंत गुढे, अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू, रा. काँ. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को. ऑप. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधीकरण मुंबईचे सचिव रसिक चौहाण, सत्कारमूर्ती कोठाळे आणि प्राचार्य डॉ. वनिता कोठाळे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, कोठाळे हे सातत्याने काम करणारे सच्चे कार्यकर्ते आहेत. आपण समाजाला काही देणं लागतो, याची ते सदैव जाण ठेवतात. आर्थिक सुधारणा हे सर्वात मोठं काम त्यांनी जिजाऊ बँकेच्या माध्यमातून केलं. त्यांनी या संस्थेकडून आजपर्यंत कोणताही भत्ता किंवा विशेष सवलती घेतल्या नाहीत, हे विेशेष. त्यांच्या पाठीशी आपण सदैव उभं राहिलं पाहिजे. कोठाळे यांची प्रेरणा नव्या पिढीने घ्यायलाच हवी. कोठाळे यांची प्रेरणा नव्या पिढीने घ्यायलाच हवी.

उद्घाटनपर भाषणात डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्या गतकाळातील आठवणी सांगितल्या. शासनाच्या या विभागामुळे कोठाळे यांच्याशी नेहमीच संपर्कात ते होते. कोठाळे यांनी त्यांच्या विभागाला उत्कृष्ट कार्यासाठी प्रोत्साहित केलं. विविध माध्यमांतून त्यांनी अनेकांना सहकार्य केलं. मदत केली. त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे. राज्यकर्त्यांनीदेखील अशा चांगल्या अधिकाऱ्यांच्या सोबतीला नेहमीच खंबीरपणे उभं राहायला हवं. त्यामुळे अनेक आमूलाग्र बदल संभवतात.

उद्घाटनपर भाषणानंतर इंजिनिअर अविनाश कोठाळे यांचा भेटवस्तू, मानपत्र, वृक्ष आणि ग्रंथ देऊन सत्कार झाला. मित्रपरिवारातील राजेंद्र जाधव, ईश्वरदास वैद्य, मोहन इंगळे, दिलीप राऊत, विद्याधर इंगोले, किशोर भांबूरकर, शीतल राऊत, हरीष देशमुख, कमल मालवीय, पुरुषोत्तम जवंजाळ, सतीश राऊत, विद्याधर इंगोले, रामधन कराळे, उमाळकर, फुटाणे, बोपचे, आर. डी. पाटील,नितीन वि देशमुख. देशमुख, मंजूषा जाधव, पद्मा वैद्य, साै राऊत, सैा मालविय, व यावेळी मान्यवरांसह उपथस्थित होते. यापूर्वी सुनील इंदुवामन ठाकरे यांची संहिता आणि निवेदन असलेली डाक्युमेंट्री दाखवण्यात आली. त्याचं चित्रण आणि संकलन उमेश राऊत आणि नागसेन यांनी केलं.

प्राचार्य डॉ. वनीता अविनाश कोठाळे यांनी कोठाळे यांच्य विविध पैलूंवर प्रकाश टाकला. पती-पत्नीच्या नात्यातील सामंजस्यावर त्यांनी चर्चा केली. त्यांच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कोठाळेंनी कशी मदत केली, हेदेखील डॉ. वनीता यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं.

सन्मानाला उत्तर देताना इंजि. अविनाश कोठाळे यांनी मित्रपरिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मित्र, परिवार आणि समाजानं मोठं केल्याचं ते म्हणाले. हाती घेतलेलं काम हे उत्कृष्ट करण्यावर त्यांचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजाच्या आर्थिक पैलूंवरही त्यांनी यथासांग चर्चा केली. माणसं उभी करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

प्रवीण पाटील पोटे यांनी अविनाश कोठाळे यांच्या कार्यासाठी गौरवोद्गार काढलेत. आपण स्वतः कार्य करून इतरांना प्रेरित करणे हा कोठाळे यांचा स्थायीभाव असल्याचं ते म्हणाले. आपण समाजात जे पेरू तेच उगवतं. कोठाळे यांनी जिजाऊ बँकेच्या माध्यमातून अनेकांना उभं केलं. त्यांनी नव्या पिढीला उद्योग आणि व्यवसायाकरिता प्रेरणा दिल्यात.

संजय खोडके यांनी त्यांच्या जुन्या स्नेहसंबंधाचा यावेळी उल्लेख केला. कोठाळे यांनी इंजिनिअर्सची जी चळवळ समृद्ध केली त्याबद्दल त्यांचं कौतुकही यावेळी केलं. कोठाळे यांचं सामाजिक कार्य, त्यांची कार्याची वृत्ती आणि तळमळ यांची दखल खोडके यांनी आपल्या भाषणातून घेतली. कोठाळे हे झपाटलेल्या प्रेरणेने काम करतात. रोष किंवा कौतुक याची कसलीत तमा ते बाळगत नाहीत. कोठाळे यांचं कार्य हे ध्येयप्रेरित आणि सुनियोजित असल्यााचंही खोडके यावेळी म्हणाले.

हा योग्य व्यक्तीचा सन्मान होत असल्याचं माजी खासदार अनंतराव गुढे म्हणाले. शिवटेकडीवरील त्यांच्या बैठकीचं त्यांनी आपल्या अत्यंत खुमासदार शैलीत वर्णन केलं. माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला अधिक महत्त्व असतं. समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी कोठाळे यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचंही यावेळी गुढे म्हणाले.
याप्रसंगी 4वर्षापासुन रखडलेला प्रहार भाजी व संत्रा प्रकिया ऊद्याेग जिजाऊ बँकेच्या सकारात्मकतेमुळे सुरु होणार असून काेठाळे हे सामान्य व्यक्तींना मदत कऱतातव सर्वसामाण्यांच्या आर्थिक विकासाचा कड लक्ष देतात ही समाजाेन्नतीकरीता महत्वाचे असल्याचे म्हटले.

एकेकाळी वर्गमित्र असलेले रसिक चौहाण यांनी त्यांच्या कॉलेजजीवनातील आठवणी आपल्या भाषणातून सांगितल्या. कोठाळे हे सर्वांच्या मदतीला सज्ज असतात. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्याचंही ते म्हणाले. शासकीय सेवेत असताना त्यांनी सिंचनाचं केलेले काम हे खरोखर अद्भूत होतं. त्यातही कंत्राटदारानां जिजाऊ बँकेशी जोडून अनेक कामं त्यांनी कौशल्यानं मार्गी लावलीत. कोठाळे यांच्या पत्नी डॉ. वनिता यांनी केलेल्या सहकार्याचाही त्यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.

इंजि. अविनाश यांचे मोठे भाऊ अॅड. विजयराव कोठाळे यांनी त्यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्यावर उपस्थितांशी संवाद साधला. अविनाश हे कोणतीही समस्या सोडवण्यात एक्सपर्ट असल्याचं ते म्हणाले. भावंड आणि परिवारातील सदस्य म्हणून त्यांच्या नात्यांची वीण अत्यंत घट्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांतील कार्याचाही त्यांनी गौरव केला.

प्रत्येकालाच प्रेरणा मिळावी असं अविनाश कोठाळे यांचं कार्य असल्याचं माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील म्हणाले. सोहळ्याच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना त्यांनी विविध विषयांना हात घातला. कोळाळे सारखे अनेक लोक कार्य करतात. आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपापल्या परीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे. एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती बाजूला सारली पाहिजे. कोठाळे आता शासकीय सेवेतून निवृत्त झालेत. आता त्यांनी पुढील वेळ हा समाजासाठी द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या सोहळ्याचं संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केली. प्रस्तावना ईश्वरदास वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन कमल मालवीय यांनी केलं. डॉ. नयना दापूरकर यांनी गायलेल्या राष्ट्रवंदनेने या सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमात असंख्य अभियंते, जिजाऊबँचे सभासद, अभियंता पत संस्थेचे भागधारक, पंडित काळे, झाले रेड्डी, असंख्य अभियंते, सेवानिव्रुत अभियंते,महात्मा फुले बँक अध्यक्ष राजेन्द्र आंडे,अभिनंदन देठे, व सहकार क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती कार्यक्रमात हजर हाेते,शिवटेकडीवरील मित्र परीवारांनी सत्कार केला।
 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.