विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील नागरिक त्रस्त

अनेकदा तर दिवस-रात्र लाईन बंद

0

सुशील ओझा, झरी: गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील जनता विजेच्या सततच्या लपंडावा मुळे त्रस्त झाली. वीज वितरणाच्या गलथान कामविरुद्ध संताप व्यक्त करीत आहे. तालुक्यात पाटण,मुकूटबन, अडेगाव, झरी व हिवरा बारसा या पाच ठिकाणी सबस्टेशन्स आहेत. या सबस्टेशन्सवरून १०६ गावांतील विद्युत पुरवठा सुरू आहे.

यापूर्वी मुकूटबन व पाटण या दोन सबस्टेशन वरून सर्व गावांना सुरू होता. कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने झरी,हिवरा बारसा व अडेगाव या ठिकाणी सबस्टेशन उभारूनसुद्धा दररोज लाईन जाणे येणे सुरू राहते. अनेकदा तर दिवसभर कधी रात्रभर लाईन राहत नाही. याबवत विचारणा केली असता वरून लाईन गेली तर कधी ३३ केवी लाईन बंद झाली असे उत्तर ऐकला मिळते.

दिवसभरात जवळपास २० ते ३० वेळा लाईन येणे जाणे करते ज्यामुळे विजेवर चालणाऱ्या उपकरणावर फरक पडत असून उपकरणे जळाले आहे. तालुक्यातील झरी, खातेरा, अडेगाव ,पिंपरड ,मांगली व हिरापूर येथील जनतेच्याअ तक्रारी मोठ्या प्रमाणात ऐकला मिळत आहे. या गावातील अडेगाव व खातेरा गावातील तीन चार महिन्यापासून डीपी सुद्धा जळून गेल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत वेळोवेळी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही कुणीच लक्ष देण्यास तयार नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे.

अडेगाव सबस्टेशनवरून अडेगावसह विद्युत पुरवठा होणाऱ्या अनेक गावातील जनतेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असून एकदा लाईन गेली की सबस्टेशनवरून लवकर सुरू करीत नाही. कधी कधी तर रात्रभर अंधारात रहावे लागत आहे. ऑपरेटला लोकांनी फोन केला असता लाईन वरून बंद असल्याचा पाढा नेहमी वाचला जात असल्याची ओरड जनतेची आहे.

झरी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सब रजिस्टर्ड कार्यालय, आरोग्य कार्यालय, शिक्षण कार्यालय, बँक व महत्वाचे म्हणजे न्यायालय आहे. हे सर्व कार्यालय ऑनलाइन असल्याने कार्यालयातील कामकाज कॉम्प्युटर द्वारे केल्या जाते परंतु झरीत सबस्टेशन असूनसुद्धा दररोज लाईन दिवसभर लाईन नसते.

दिवसातून १०० वेळ ट्रिप होत राहते एकही दिवस लाईन २४ तास सुरू राहिली असा एकही दिवस नाही हे विशेष. लाईनमुळे शासकीय कामात मोठी अडचण निर्माण झाली असून शेतकरी,शालेय विद्यार्थी व इतर सर्व कामे ठप्प पडली आहे. लाईन मुळे शासकीय कामे ठप्प पडत असल्याने जनतेच्या रोशचा सामना अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

उपकार्यकरी अभियंता यांनी तालुक्याचे सूत्र हाती घेताच अनेक कामे चांगली केली. त्यांनी जनतेच्या मनात आपली छाप सोडली आहे. परंतु गेल्या एक महिन्यापासून जनतेच्या तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे. तरी जनतेचा तक्रारीचे निवारण त्वरित करावे व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.