पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील व तालुक्यातील आधार केंद्र गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आधार कार्ड नसल्याने व नवीन कार्ड काढता येत ऩसल्याने विविध महत्त्वाची कामे रखडल्या गेली आहे. त्यामुळे ही केंद्रे त्वरित सुरू करा अशी मागणी वणीतील पत्रकारांद्वारे करण्यात आली. या संदर्भात सोमारी उपविभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले.
आधार कार्ड अनेक ठिकाणी सक्तीचे केले आहे. मात्र नवीन आधार कार्ड काढण्यासाठी जे केंद्र दिलेले आहेत ते संध्या बंद असल्याने त्याची चांगलीच झळ वणीकरांना बसत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील काही आधार केंद्रे केंद्रे सुरू आहे. त्यामुळे सुरू असलेल्या केंद्रावर नागरिकांची कार्ड काढण्यासाठी एकच झुंबड उडते. तिथल्या गर्दीमुळे तासंतास उभे राहून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो शिवाय वेळही खर्च होत आहे.
आयकर विभागाने पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे 31 मार्चपर्यंत आदेश दिले आहे. तसेच शाळा महाविद्यालय यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना आधार अपडेट करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहे. मात्र वणीतील आधार केंद्र बंद असल्याने तसेच तालुक्यातील केवळ मोजकेच आधार केंद्र सुरू असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. बंद असलेले आधार केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी वणीतील पत्रकारांनी केली आहे.
निवेदन देते वेळी बंडू निंदेकर, संदीप बेसरकर, राजू धावंजेवार , मोहम्मद मुस्ताक, श्रीकांत किटकुले,आकाश दुबे ,सुरेंद्र बोथरा, सागर मुने, राम झिले ,संतोष पेंदोर, पंजाबराव उरकुडे, केतन पारखी यासह वणी व परिसरातील काही लोककलावंतही उपस्थित होते.