नायगावजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ऑटोची दुचाकीला धडक, दोघे जखमी

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी संध्याकाळी वरोरा रोडवरील नायगावजवळ ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गोपाळ प्रकाश मुगरे, अनिकेत विनायक धारणे व सागर मनोहर चौधरी हे वाघाडा तालुका चिमुर येथील रहिवाशी असून ते वणीला कामानिमित्त आले होते. संध्याकाळी गावाला परता जाताना नायगाव येथे विरुद्ध दिशेने येणार ऑटोने (MH29 M5407) त्यांच्या दुचाकीला (MH 34 Q 7679) जोरदार धडक दिली.

या अपघातात गोपाळ प्रकाश मुगरे (25) याच्या डोक्याला गंभीर इजा झाली व त्यातच याचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले अनिकेत व सागर यांनाही दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ऑटो चालकास अटक करण्यात आली आहे. तो सावर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याच्यावर कलम 279,337, 404(अ)भादवी अ 134 अ,134 ब मोटार वाहन कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याआधीही नायगाव जवळ अनेकदा अपघात झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.