मुकूटबनमध्ये भाजी महागली, किराना मालाची चढ्या दराने विक्री
40 रुपये किलोची भाजी झाली 60 ते 70 रुपये
सुशील ओझा, झरी: सध्या संचारबंदी लागताच त्याचा आर्थीक फायदा करून घेणा-यांचीही संख्या वाढली आहे. भाजीपाली विक्रेता, औषधी विक्रेता व किराणा दुकानदार हे चढ्या दराने विक्री करीत आहेत. अशा तोंडी तक्रारी ग्रामपंचायतीकडे करण्यात आल्या आहेत.
भाजीजीपाला विक्रेते वणी वरून ठोक दरात भाजीपाला आणून चिल्लर मध्ये दुप्पट दरात विक्री करीत आहे. भाजीपाला विक्रेते भेंडी वांगे ढेमसे ६० रुपये तर कांदे ५० रुपये किलोने विक्री करून दुप्पट भावाने विक्री करून जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. तर बाहेर गावातील शेतकरी भाजपला कमी दरात विक्री करण्यासाठी आला असता त्याला हाकलून देत असल्याची माहिती मिळत आहे.
तर औषधी दुकानात एकच औषधीच्या दरात तफावत असल्याची ओरड ऐकाला मिळत आहे. तर काही किराणा दुकानात सुद्धा सामानाच्या दरात तफावत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.