लॉकडाऊनमुळे खवय्यांची गोची

हॉटेल, ढाबे बंद: जिभेच्या चोचल्याला लगाम

0

जब्बार चीनी वणी: विविध चमचमीत पदार्थावर ताव मारण्यासाठी सुटीच्या दिवसाची प्रतीक्षा केली जाते . रविवारपासून वणीकरांना सुटी मिळाली खरी , मात्र कोरोनाच्या भीतीने हॉटेल , ढाबे , टप या बंद आहेत . त्यामुळे जिभेचे चोचले पुरविता येत नसल्याने खवय्यांची गोची झाली आहे .

खवय्यांच्या गर्दीने ओसांडून वाहणारे हॉटेल संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ओस पडल्याचे सर्वत्र दिसून येत आहे . त्यामुळे अनेकांनी आपली जिभेची हौस घरीच विविध पदार्थ करून भागवली जात आहेत . दर रविवार एकत्र येऊन पाणीपुरी , भेळ , जेवण अशी आखणी करण्याची पध्दतच वणीत मोठ्या प्रमाणात रूजली आहे .

शहर व शहराबाहेरील अनेक पॉइंट त्यासाठी ठरलेले आहेत . मोठी आर्थिक उलाढालही याच व्यवसायातून होत असते . तथापि , यंदाचा रविवार व त्यानंतरचे दिवस या कोरोनामुळे अपवाद ठरत असून , करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसही हॉटेलिंगकडे कल कमी राहणार असल्याचे दिसून येत आहे .

शौकिनांचे सर्वच पर्याय सर्वच बंद
बोकडाचे , कोंबडी व मासोळीचे मटन सुद्धा मिळत नसल्याने मासाहरी खवय्ये परेशान आहेत . सध्या घरातच थांबावे लागत असल्याचे कुटुंबात राहून घरीच चमचमीत पदार्थावर नागरिक ताव मारत असल्याचे दिसून येत आहेत . विशेष म्हणजे , संचारबंदीत कुणी जर बाहेर पडले , पाणीही मिळणे कठीण झाले आहे . विशेष म्हणजे , गुटखा व मदीरा शौकिनांची तर विचारायला नको अशी सध्याची स्थिती असल्याचे दिसून येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.