खरबडा येथे वीज पडून 5 गायींचा मृत्यू

कोरोनातच शेतकऱ्यांवर अस्मानी संकटही

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खरबडा येथे वीज पडल्याने पाच गाईंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. झरी तालुक्यात 28 मार्च रोजी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला. त्यात विजा मोठया प्रमाणात कडाडत होत्या. रात्री १०.३० दरम्यान खरबडा येथे वीज पडली. यात पाच गायींचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत गावातील संतोष नागरतवार यांच्या 4 गायी तर हनमंतू कोतावार यांची एक गाय अशा पाच गायींचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पाटील विनोद पेरकावार तलाठी संदीप सोयाम कोतवाल मनोज चिकराम यांनी पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.