संचारबंदी भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध कारवाई
पोलिसांकडून 20 तर पालिकेकडून 16 जणांवर कारवाई
जितेंद्र कोठारी, वणी: प्रशासनाचे आदेश झुगारणा-या पोलीस विभाग व नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करून 31 मार्च पर्यंत 36 लोकांविरुद्ध कारवाई करून भा.दं.वि. कलम 188 व 269 अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. या कारवाईत पोलीस विभाकडून 20 जणांविरुद्ध तर नगरपालिका प्रशासनकडून 16 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
बंदचे आदेश असताना दुकाने चालू ठेवणारे 8 पान सेंटर, 2 लिंबूपाणी ठेले, 6 मटण चिकन (मांसविक्री) दुकाने, 6 भाजीपाला व फ्रुट दुकानदारांविरुद्द कारवाई करण्यात आली. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 9 जणांविरुद्ध तर होम क्वारंटायन असताना घरा बाहेर फिरणाऱ्या एका विरुद्द कारवाई करण्यात आली. वरील सर्व कारवाईत पोलिसांकडून 92880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संचारबंदी दरम्यान बार व रेस्टॉरंट सुरू ठेवल्यामुळे वरोरा रोडवरील लॉर्ड्स बार अँड रेस्टॉरंट ला सील ठोकण्यात आले तसेच विनाकारण शहरात फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करून 100 च्या वर दुचाकी जप्त केल्याची माहिती वणीचे ठाणेदार पो.नि. वैभव जाधव यांनी सदर प्रतिनिधीला दिली .
कोरोना महामारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात 19 मार्च 2020 पासून संचारबंदी व कलम 144 लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र कायद्याचा भंग केल्याने विविध प्रकरणी पोलिसांनी ही कार्यवाही केली.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…