वणीत संशयाचे वातावरण, विविध चर्चांना ऊत

काहींच्या घरी ऍम्बुलन्स आल्याने अफवांना पेव

0

जब्बार चीनी वणी: कालपासून काही होम कॉरेन्टाईन व्यक्तींना यवतमाळ येथे हलवण्यात आल्याचे पसरताच वणीमध्ये एकच खळबळ उडाली व विविध अफवांना पेव फुटले. काल वणीमध्ये दिवसभर 4 लोकांना कोरोनाची लागण झाली, 2 लोकांना लागण झाली, अशा अफवा सोशल मीडियातून पसरत होत्या. तसेच दिवसभर हाच विषय वणीत चर्चेत होता. त्यामुळे वणीत अद्यापही संशयाचे वातावरण आहे.

वणीत सुमारे 700 लोकांनी तपासणी केली होती. यात परदेशातील, परराज्यातील तसेच कोरोनाग्रस्त शहरातून आलेल्यांची संख्याही आहे. त्यातच काल व आज सकाळी काहींना यवतमाळला हलवल्याचे वणीत पसरले त्यामुळे त्यामुळे वणीत एकच खळबळ उडाली. मात्र वणीत अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

असे पसरले संशयाचे वातावरण…

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीवरून, मंगळवारी परदेशातून व परराज्यातून वणीतून आलेल्या व सध्या होम कॉरेन्टाईन असलेल्याा काही व्यक्तींच्या घरी ऍम्बुलन्स आली होती. त्यांना यवतमाळ येथे हलवल्याचे कळले. ही घटना घडताच त्यांच्या शेजा-यांनी याची माहिती त्यांच्या संबंधीतांना दिली. यावरून सोशल मीडियावरून वणीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याची एकच अफवा पसरली. त्यात आज सकाळी काही होम कॉरेन्टाईनला यवतमाळला नेल्याचे शेजा-यांना लक्षात आले. यात अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीही होत्या. त्यामुळे संशयाला आणखीच बळ मिळाले. त्यामुळे वणीत आजही विविध चर्चेला ऊत आला आहे.

प्रातिनिधिक फोटो

अशीही एक अफवा….
काल दिवसभर ‘वणी बहुगुणी’ला फोन करून वणीत कोरोनाचा रुग्ण आढळला का याची विचारणा झाली. सोशल मीडियात अनेक अफवा पसरल्या होत्या. त्या ख-या आहे का याबाबत अनेकांनी कॉल मॅसेज करून याबाबत विचारणा केली. त्यातच वणीच्या ग्रामीण रुग्णालयात एक होम कॉरेन्टाईनने शिरून त्याने मला कोरोना झाला आहे. असे सांगून अनेकांना स्पर्श केला. अशीही अफवा पसरली. त्यासोबतच वणीत कोरोनाचे 4 रुग्ण, 2 रुग्ण अशा अफवा पसरवल्या गेल्या. अखेर वणीत अद्याप कोणताही रुग्ण नसल्याने अफवा पसरवू नये असे आवाहन ‘वणी बहुगुणी’ने सोशल मीडियात मॅसेज करून केले.

वणीत रुग्ण आढळल्यास जिल्हा प्रशासन जाहीर करणार

वणीत अद्यापही संशयाचे वातावरण आहे. विविध अफवांना पेव फुटले आहे. वणीत कॉलकरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तीच चर्चा केली जात आहे. मात्र वणीकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच अफवा परवरू नये असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. रुग्ण आढळल्यास तसे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. वणीत किंवा जिल्ह्यात कुठेही तसे काही घडल्यास त्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात येईल. त्यामुळे याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने काही सांगितल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये. अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. तसेच खबरदारी म्हणून कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन ही त्यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.