सुशील ओझा, झरी: सध्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात 1942 मजूर अडकले असून सध्या ते घरी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मुकुटबन परसरात विविध कंपनी असल्याने या कंपनीत काम करणारे हे मजूर असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, पंजाब इत्यादी ठिकाणाहून आलेले हे मजूर आहे.
मुकुटबन येथे आरसीसीपीयल कंपनीमध्ये सुमारे 3 हजार मजूर कामासाठी आहे. यातील काही मजूर परत गेले असले तरी सुमारे 2 हजार मजूर अद्याप तिथेच आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा व जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांचा अद्याप पगार न झाल्याने ते इथेच अडकले असल्याचे सांगितले जात आहे.
या मजुरांव्यतिरिक्त 17 लोक परराज्यातील, 4 विद्यार्थी राजस्थान मधील कोटा शहरातील, यवतमाळ जिल्ह्यातील 12 लोक व इतर जिल्ह्यातील 18 लोक सध्या मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात अडकले असल्याची माहिती आहे.