दुपारी 3 नंतर वणी लॉकडाऊन, आज दिसला शुकशुकाट

दुपारी 3 नंतर फिरणा-या अनेकांवर कारवाई

0

जब्बार चीनी वणी: किराणा व भाजी बाजारातील गर्दीला आळा घालण्याकरीता आजपासून भाजीपाला व किराणा सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळातच उघडी ठेवण्याच्या प्रशासनाने निर्णय घेतला. त्यामुळे आता फक्त मेडिकलच दुपारी 3 नंतर सुरू राहणार आहे. 3 नंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली परिणामी आज दुपारी 3 नंतर वणीत शुकशुकाट दिसून आला. तसेच या आदेशाची तडकाफडकी अंमलबजावणी झाल्याने याचा अनेकांना फटका बसला. टिळक चौकात पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले . असे असले तरी काही रिकामटेकडे युवक उगीच ये जा करीत होते. घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत होते. कधी बँकेचे पासबूक , कधी डॉक्टरांची चिठ्ठी तर कधी किराणा व भाजीपाल्याची पिशवी घेवून दुचाकीवर फिरत होते. तर नेहमीप्रमाणे सायंकाळी 6 ते 8 या कालावधीमध्ये कट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत होता. त्यामुळे अखेर प्रशासनाचे 3 नंतर वणी लॉकडाऊऩ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वतः सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे. सरकार , डॉक्टर , जेवढ्या काळजीने या रोगाविषयी सांगत आहेत तेवढी काळजी ही मंडळी घेताना दिसत नाही . स्वतःचीच काळजी यांना नाही तर कुटुंबाची काळजी हे घेतली का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक असतानाही दुचाकीवर दोघे तिचे फिरत आहेत.

तंबाखू , गुटखा , दारूचे व्यसन असणा यांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे . अनेक यानटपरी चालक घरून व्यवसाय करीत आहेत . त्यांनीही गर्दीचे नियम पाळणे बंधनकारक आहे . विनाकारण फिरणा या तरूणांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे . दुचाकी पकडणे , परवाना जप्त करणे , असा दंडात्मक उपाय केल्याशिवाय ऐकणार नाहीत . त्यामुळे आता कठोर होणे गरजेचे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.