यवतमाळ जिल्ह्यातील 8 रुग्णांना कोरोनाची लागण

वणीतील 'त्या' तिघांचे रिपोर्टमध्ये नाव नाही...

0

जब्बार चीनी, वणी: आज यवतमाळ येथे 8 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जे नवीन रिपोर्ट आले ते सर्व तबलिगीशी संबिधीत असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यामध्ये वणीच्या एकाचेही नाव नसल्याने सध्यातरी वणीकरांना दिलासा मिळाला आहे. वणीतील निजामुद्दीन येथे गेलेले तीन व इतर एक अशा चार व्यक्ती सध्या यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये आहे. त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. त्यामुळे वणीकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

वणीतील निजामुद्दीन येथे गेलेले तीन व इतर एक तसेच रविनगर येथील एक व एक महिला यांना खबरदारी म्हणून आयसोलेशन वार्डमध्ये टाकण्यात आले होते. त्यातील रविनगर आणि एक महिला यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उर्वरित 3+1 हे अद्याप आठ दिवसांपासून आयसोलेशनमध्येच आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याने त्यांना आणखी काही काळ तिथेच थांबावे लागणार आहे.

वणीकरांना तात्पुरता दिलासा

या संदर्भात ‘वणी बहुगुणी’ने आयसोलेशन वार्ड मधल्या वणीतील लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती दिली. तसेच आयसोलेशन वार्डातील चार-पाच लोकांना ऍम्बुलन्स येऊन घेऊन गेली असल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ दोन दिवसांसाठी घेऊन गेल्यावर अद्याप आठ दिवस होऊनही रिपोर्ट न आल्याने त्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली.

प्रातिनिधिक फोटो

सध्या वणीतील संशयीतांचे रिपोर्ट न आल्याने वणीकरांना काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. आज जे रिपोर्ट आले ते तबलिघी जमातशी संबंधीत असल्याची माहिती मिळत आहे. वणीतील ते तीघे मरकज येथे सहभागी नव्हते मात्र ते दरम्यानच्या काळात निजामुद्दीन परिसरात गेले असल्याने त्यांना खबरदारी म्हणून आयसोलेशनमध्ये टाकण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.