शब-ए -बरात घरीच साजरी करण्याचे आवाहन

वणीतील मस्जिद कमेटीच्या वतीने आवाहन

0

बहुगुणी डेस्क, वणी: आज गुरुवारी साजरी होणारी शब-ए-बरातची रात्र मुस्लिम बांधवांनी आपल्या घरी कुटुंबातच साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन वणी शहरातील सर्व मस्जीद कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या देशभरात संचारबंदी असून गल्ली, मोहल्या, एखाद्याच्या घरी किंवा टेरेसवर जमाव करून नमाज पठण व प्रार्थना केल्यास आदेशाचा भंग होणार आहे. त्यामुळे याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मौलाना मोहसीन खान व मौलाना सद्दाम हुसैन यांनी केले आहे.

रमजान ईद व महिनाभर होणाया रोजा अर्थात उपवासांच्या पार्श्वभूमीवर शबेबरातला मुस्लिम धर्मात विशेष महत्व आहे. शब-ए-बरात ही मुस्लिम बांधवांची मोठी रात्र म्हणून सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत मशिदीत विविध धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना तसेच सामूहिक नमाज पठाण केले जाते.

उपासनाविधीनंतर रात्री कब्रस्तान येथे जाऊन दिवंगतांसाठी विशेष प्रार्थना केली जाते. यावेळी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कब्रस्तान येथे कुलूप लावलेले असून रात्री कब्रस्तानमध्ये प्रार्थनेसाठी कोणालाही जाता येणार नाही. समाजातील काही लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो आहे. हे लक्षात घेऊन घरच्या घरीच धार्मिक कार्यक्रम करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इस्लामचा शांततेचा व परोपकाराचा संदेश द्या – मौलवी

काही अतिउत्साही व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणा-या कायदेशीर कारवाईस ती व्यक्ती स्वत: जबाबदार राहणार. तथापि, कोरोनारूपी या राक्षसी संकटाचा जगातून कायमचा नायनाट व्हावा सर्वाना सुखी, समृध्द, आरोग्यदायी व शांततामय जीवन मिळावे यासाठी विशेष प्रार्थना करून शुक्रवारचा होणार रोजा अर्थात उपवास करावा. तसेच गरीब व गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात दानधर्म करून आणि देशाच्या व राज्याच्या रिलीफ फंडात मदत करून इस्लामचा शांततेचा व परोपकाराचा संदेश द्यावा – मौलवी, मस्जिद कमिटी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.