सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली ग्रामपंचायत द्वारे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत गावपातळीवर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता संपूर्ण गावात निर्जंतुकिकरण फवारणी केली. तसेच गावातील एकूण ७०० कुटुंबाला आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटायझरचे गावात फिरुन घरोघरी वाटप केले.
सरपंच नितीन गोरे ग्रामसेवक गणेश उईके जि प मुख्याध्यापक खडसे ,शिक्षक गोपतवार ,संजय हुडे, आरोग्य सेविका के एन नागपुरे अंगणवाडी वनकर, रंजना गेडाम , आशा वर्कर सविता मेश्राम तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राखुंडे पोलीस पाटील नामदेव सातघारे ग्रामपंचायत कर्मचारी नानाजी बद्रे ईश्वर तेलंग यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.