शिवसेनेतर्फे शासकीय कर्मचा-यांना सॅनिटायझरचे वाटप

तहसिल कार्यालयात कर्मचा-यांना साहित्याचे वाटप

0

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे आलेल्या आपत्तीमध्ये शासकीय कर्मचारी दिवसरात्र एक करून आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहेत. त्या कर्मचा-यांना कोरोनापासून संसर्ग होऊ नये यासाठी शिवसेनेतर्फे आज रविवारी सकाळी 11 वाजता सॅनिटायझर व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसिल कार्यालयाच्या आवारात सकाळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील इत्यादी शासकीय कर्मचा-यांसह आरोग्य विभागाचे व नगरपालिकेचे कर्मचारी यांना सॅनिटायझर व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. विश्वास नांदेकर, तहसीलदार शाम धनमने, ठाणेदार वैभव जाधव, मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा, वणी तालुकाप्रमुख रवी बोढेकर, महेश चौधरी, नरेंद्र ताजणे, अजय नागपुरे, बंटी येरणे, प्रशांत बलकी, आनंद घोटेकर, लांडे, अमोल बोरूले, तुलसी तेवर, राकेश नागरकर, कमलेश बाबू, गोपी पुरावार, मोहोड ताई, ढवस ताई, नांदेकार ताई, नीलम ठाकरे, प्रशांत मोहड इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.