सुशील ओझा, झरी: नोंदणी न करता व मोबाईलवर एसएमएस आल्याशिवाय बाजर समितीमध्ये कापूस आणू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजर समिती मुकुटबन तर्फे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी ही 25 एप्रिलपर्यंत करता येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतक-यांना मोबाईलद्वारा कापूस आणण्यासाठीची सूचना दिली जाणार आहे. तसेच कोणत्या वेळी कापूस आणायचे आहे याची माहितीही दिली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी द्विधा मनस्थितीत राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे. खासगी कापूस खरेदीलाही हाच नियम लागू असणार आहे.
ज्या शेतक-यांकडे FAQ दर्जाचा सीसीआयच्या नियमात बसणार असा कापूस आहे. त्या शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत लिपिक, विठ्ठल उईके मो नं. 9922036098 , कनिष्ठ लिपिक दयाकर एनगंटीवार मो नं. 9075865411 यांच्याकडे नोंदणी करावी.
शेतक-यांनी काय घ्यावी काळजी ? कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येताना शेतकरी व वाहन चालक यांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. वाहनाला प्रवेश दारावरच फवारणी केली जाणार आहे. तसेच मास्क किंवा दुपट्टा न बांधलेल्या व्यक्तींना बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
स्टॉक फोटो
केवळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतच नोंदणीसाठी कॉल करावा. त्या कालावधीत नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांचा कापूस घेतल्या जाईल. 25 एप्रिलनंतर नोंदणी बंद झाल्यावर केंद्र बंद केले जाईल. त्यामुळे दिलेल्या कालावधीतच नोंदणी करावी असे आवाहन कृषी उत्पन्न समिती चे सभापती संदीप बुररेवर उपसभापती संदीप विंचू व सचिव रमेश येल्टीवार यांनी केले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.