मजुरांच्या मदतीसाठी सरसावली महिला ब्रिगेड
ग्रामीण भागातील 101 कुटुंबांना किराणा किटचे वाटप
जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे सर्वाधिक फटका मजुरांना बसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे रोजगार जाऊन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी वणीतील धनोजे कुणबी समाज महिला आघाडी सरसावली आहे. संघटनेच्या अध्यक्षा वंदना आवारी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पुढाकार घेऊन परिसरातील ग्रामीण भागात जाऊन मजुरांना किराना मालाची किट वाटप केल्यात.
महिलांनी कायर, चेंडकापूर, बाबापूर ई. गावात तसेच एम.आय.डी.सी., परिसरातील कामगारांना 101 किराणा किटचे वाटप केले. मदत योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गरजूंची माहिती काढणे तसेच किराणा सामानची पॅकिंग पासून ते त्याचे वाटप करण्यापर्यंत सर्व कार्य महिलांनीच केले.
कार्यासाठी वंदना आवारी, कविता चटकी, साधना मत्ते, मीनाक्षी देरकर, लता वासेकर, संध्या नांदेकर, किरण देरकर, साधना गोहोकार, माया गौरकार, वृन्दा पेचे, ज्योती सूर, स्वप्ना पावडे, अर्चना बोदाडकर, वनिता काकडे, रेखा कापसे, वंदना वर्हाटे, वर्षा पोटे, शांताताई काळे यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.