घराबाहेर व्हायरस कोरोना, घरात गरमीसे मरोना

विजेच्या लपंडावाने तालुक्यातील जनता वैतागली

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जनता लॉकडाऊन सोबतच विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याचेही त्रस्त झाली आहे. तालुक्यात १०६ गावे असून मुकूटबन, अडेगाव, पाटण, झरी व हिवरा बरसा या पाच ठिकाणी पॉवर सबस्टेशन सुरु आहे. परंतु गेल्या १५ दिवसापासून झरी अडेगाव व इतर काही गावात विजेच्या लपडवामुळे व कमी दाबाच्या पुरवठ्या मुळे तर कधी दिवसभर रात्रभर लाईट जात असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. ज्यामुळे घरात राहून राहून जनता त्रस्त झाली आहे. उन्हाळा सुरू झाला असून सूर्य आग ओकत आहे ज्यामुळे गर्मी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाईटच्या लपंडावामुळे साधा पंखा लावून थोडी विश्रांती सुद्धा घेता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बहुतांश घरात लहान मुले वयोवृद्ध पुरुष तर कुणाच्या घरी आजारी व्यक्ती आहे. अश्या व्यक्तीची मोठे हाल होताहेत. सध्या कोरोनाचा दहशतीमुळे तसेच जनतेच्या सेवेकरिता झरी येथे बहुतांश अधिकारी कर्मचारी मुख्यालयी हजर असून याचा फटका अधिकारी कर्मचारी वर्गांना होत आहे. लाईन बाबत अनेक तक्रारी तहसीलदार यांच्याकडे जनतेनी केल्या असून याचा उपयोग काहीच झाले नसल्याचे दिसत आहे.

लाईनच्या समस्येबाबत संमधीत कर्मचारी यांना विचारणा केली असता वरूनच फॉल्ट किंवा बंद असल्याचे टेपरेकार्ड ऐकला मिळते. आधीच “कोरोना च्या भीतीने बाहेर पडून मरोना व लाईन नसल्याने घरात गर्मीने मरोना ” अशी परिस्थिती तालुक्यातील जनतेची झाली आहे. ज्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर जनता प्रचंड संताप व्यक्त करीत आहे. तरी वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन लाईनच्या समस्या सोडवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

देशासह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन संचारबंदी व जमावबंदीचे आदेश जाहीर झाल्यापासून जनतेला घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे. अत्यावश्यक वस्तू खरेदी व्यतिरिक्त बाहेर पडल्यास कार्यवाहीचा बडगा उगारला असल्यामुळे लहान मुलापासून तर वयोवृध्द पर्यंत सर्वांनाच कोरोनाचा भीतीने घरात रहावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.