वणीतील मित्रमंडळातर्फे परप्रांतीय मजुरांना टिफीन वाटप
एक महिन्यापासून रोज 125 मजुरांना टिफीन सेवा
वणी बहुगुणी डेस्क: लॉकडाऊनमुळे सध्या मजुरांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वणीतील सामाजिक भान जपणारी काही मित्र मंडळी एकत्र आली व ते गेल्या एक महिन्यापासून परिसरातील मजुरांना टिफिनची सेवा देत आहेत.
दिनांक २५ मार्च २०२० पासून वणीतील वडगाव ट्रीप, अहेरी नदी, पद्मावती नगरी, भूमी पार्क, काळे लेआउट वणी रेल्वेस साईडिंग इत्यादी ठिकाणी दररोज १२५ भोजन डब्बे पोहोचविण्याचे कार्य या मित्र मंडळी तर्फे सुरू आहे. हा उपक्रम बंडूभाऊ चांदेकर, सुधीर थरे, राजू मालेकर, रवी देठे, सुभाष ताजणे, संतोष रामगिरवार, निकेश थेरे, संजय गजभिये, यांच्या सहकार्याने सेवा सुरू आहे.
उपक्रमात वेकोलिचाही हातभार
लॉक डाऊन वाढल्यामुळे या कार्यात त्यांना डब्ल्यूसीएल कर्मचाऱ्यांचेही विशेष योगदान लाभले. त्यात मधुकरजी भोयर, अनीलजी भुसारी, सतीशजी पुसदकर, संजयजी ढवळे, सुरेशजी निळकंठ काकडे, विठ्ठलराव चिकनकर आणि मित्रपरिवार इत्यादीच्या सहयोगाने ही सेवा पूर्ण केल्या जात आहे.