गरजूंच्या मदतीसाठी सरसावली युवासेना

जीवनावश्यक वस्तू व डब्ब्यांची घरपोच सेवा

0

वणी बहुगुणी डेस्क: गरजूंना किराणा, औषधी याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूंची सेवा सध्या युवासेने द्वारा वणी आणि परिसरात दिली जात आहे. यासह गरीब मजुरांना घरपोच जेवणाचे डब्बे पुरवण्याचे काम ही युवासेनेतर्फे सुरू आहे. माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू आहे.

कोरोनामध्ये घराबाहेर न निघण्याची गाईडलाईन प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी युवासेनेने पुढाकार घेतला असून युवासेनेद्वारा सध्या वणीमध्ये घरपोच वस्तू देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मोलमजूरी करणाऱ्या लोकांना जेवण पुरवण्याचा उपक्रम शिवसेना युवासेनेतर्फे घेण्यात आला आहे. यासाठी युवासेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन अशा गरजूंपर्यंत डब्बे पोहोचवत आहे.

सामान्य नागरिकांना हेल्पलाईनद्वारा औषधी, किराणा, गाडी इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय दुकानदारांना मास्क व सॅनिटाइजर वाटप करण्यात आले. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात दिव्यांगांना धान्यांच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण कार्यासाठी युवासेनेचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

युवासेनेतर्फे मास्कचे वाटप
Leave A Reply

Your email address will not be published.