मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक
एकाच वेळी पाच व्यक्तींच्यावर मशिदीत कुणीही जाऊ नये
सुशील ओझा, झरी: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान 25 एप्रिल पासून सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुकूटबन व पाटण पोलीस स्टेशन मध्ये 24 एप्रिलला शांतता कमिटीची बैठक तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील मौलाना मजिद कमिटीचे सदस्य व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता सर्व मुस्लिम बांधवानी सावधान राहून रमजान सण घरात पार पाडण्याचे सांगण्यात आले. मजिद मध्ये मौलानासह चार व्यक्तीच्या वर कुणीही मजिद मध्ये जाऊ नये. नमाज आपल्या घरीच करावी,जगनेकीं रात सुद्धा आपापल्या घरीच करावी कोणतेही इफ्तार पार्टी करून नये.
मार्केटमध्ये गर्दी करू नये, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पाळावे अश्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता सरकारने लॉकडाऊन केले आहे. आपल्यामुळे कुणालाही कोरोना संसर्ग होऊ नये याची दक्षता घेत सर्व मुस्लिम बांधवानी आपली नमाज इतर कार्यक्रम घरीच करावी अश्या सूचना वरील अधिकारी यांनी दिल्या.