मोहदा येथे गरजूंना 500 रॅशन किटचे वाटप

ग्रा.पं. च्या पुढाकाराने क्रॅशर व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा उपक्रम

0
जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे गावातच अडकलेले परप्रांतीय कामगार, ट्रकचालक, मजूर व गावातील गोरगरीब कुटुंबाना उपासमारीची वेळ येऊ नये, या करिता मोहदा, ता. वणी, जि. यवतमाळ येथे पाचशे रेशनकिटचे वाटप गुरुवारी दि. 23 एप्रिल रोजी करण्यात आले.
मोहदा ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने मोहदा क्रॅशर असोसिएशन व ट्रान्सपोर्ट संघटने तर्फे तयार रेशन किट मध्ये 5 कि.ग्रा. आटा, 5 कि. ग्रा. तांदूळ, मीठ, हळद, तिखट, तेलाचे पाकीट प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. या वेळी मोहदा ग्रा.पं. चे सरपंच गौतम सुराणा, उप सरपंच रवी गोवरदीपे, सचिव सुगदे, पटवारी उराडे, पो.पा. ज्ञानेश्वर डावे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष हरिदास केलझरकर, प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर येसेकर, विनोद पा. कुचनकर, क्रॅशर असोसिएशन तर्फे प्रशांत उरकुडे, चंद्रशेखर देठे व ग्राम पंचायत कर्मचारी सुधाकर शंकावार, विनोद नक्षिणे उपस्थित होते.
रेशन किट साठी मोहदा येथील क्रॅशर धारक मे. विदर्भ प्रोजेक्ट प्रा. ली., तायनी मिनिरल, ITPL कन्स्ट्रक्शन, श्री साई मिनिरल्स, गजानन कन्स्ट्रक्शन, टी. एन. चौधरी, जगदंबा मिनिरल्स व इतर क्रॅशर कंपन्यांनी आर्थिक साहाय्य दिले.
वणी तालुक्यातील मोहदा येथे अनेक गिट्टी क्रशर व खाणी असून बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यातील हजारो कामगार येथे ट्रकचालक, जेसीबी ऑपरेटर, क्रॅशर ऑपरेटर, खलाशी, हेल्परचे कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लॉकडाउन नंतर काही कामगार परत आपल्या राज्यात गेले तर शेकडो मजूर कुटुंब मोहदा येथेच अडकून आहे. 
Leave A Reply

Your email address will not be published.